Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

Press Release : प्रेक्षकांची वाढती गर्दी पाहून २८ जानेवारीपासून होणार 'लकडाऊन' पूर्ण महाराष्ट्रात चर्चा

Press Release: Seeing the growing crowd of spectators
, बुधवार, 1 डिसेंबर 2021 (14:28 IST)
लॉकडाऊन नंतर प्रेक्षक पुन्हा चित्रपट गृहांकडे वळत असून हिंदी चित्रपटाच्या सोबतच मराठी चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या मनोरंजनाला तत्पर आहेत. एक एक करून सगळेच आपल्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करत असून, इष्णव मीडिया हाऊसचा 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या चित्रपटाची सुद्धा तारीख निश्चित झाली असून, या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन नुकतंच खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेना भवनात झाले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने सचिन अहिर, रविंद्र मिर्लेकर यांच्या सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांची प्रमुख भूमिका असलेला लकडाऊन हा चित्रपट येत्या २८ जानेवारी ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कथा ही त्याच्या नावातच लपलेली आहे. लॉकडाऊन दरम्यान ठरलेल्या एका लग्नाची ही धमाल गमतीची गोष्ट आहे. लकडाऊन या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची  मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाची कथा ज्या प्रमाणे लॉकडाऊन मध्ये घडली तसाच हा चित्रपट लॉकडाऊन मध्ये चित्रित केला आहे. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्णतः शिवजन्मभूमी जुन्नर (किल्ले शिवनेरी) येथे झाले आहे. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये अंकुश आणि प्राजक्ता लग्नाच्या बेडीत अडकलेले दिसत असले तरी त्यासाठी त्यांना करायला लागणारी धावपळ म्हणजे या चित्रपटाचं कथानक. चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश आणि प्राजक्ता ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. चित्रपटाला संगीत अविनाश - विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली असून चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World's Most Expensive Cities:पॅरिस किंवा सिंगापूर नाही, हे जगातील सर्वात महाग शहर आहे