Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रियांका घेऊन येत आहे मराठी चित्रपट

प्रियांका घेऊन येत आहे मराठी चित्रपट
प्रियांका चोप्राने गेल्याच वर्षी व्हेंटिलेटर या तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. विनोदी, पण ति‍तकेच अंतर्मुख करायला लावणार्‍या व्हेंटिलेटर या चित्रपटाची निर्तिती केल्यानंतर आता ती प्रेक्षकांना खळखळून हसवायला सज्ज झाली असूत ती काय रे रास्कला या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला.

मुहूर्तावेळी प्रियांकाची आई डॉ. मधू चोप्रा, चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीधरन स्वामी तसेच गौरव घाटणेकर यांसारखे चित्रपटातील कलाकारही यावेळी उपस्थित होते. त्याशिवाय चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटवणारी कुनिका सदानंदही यावेळी उपस्थित होती. कुनिका निर्मातीची भूमिका साकारात आहे.
 
प्रियांका स्वत: मुहूर्तावेळी उपस्थित राहू शकली नसली तरी व्हिडिओद्वारे तिने संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. तर हा चित्रपटही प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता 'रईस' ला शिवसेनेचा विरोध