Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहूल चौधरी यांचा आणखी एक दर्जेदार सिनेमा 'इबलिस'

rahul choudhari
, मंगळवार, 3 एप्रिल 2018 (12:02 IST)
५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ६ नामांकनं आणि ४ राज्य पुरस्कार पटकावणाऱ्या 'बंदूक्या' सिनेमाचे दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी हे तेशा गर्लचाईल्ड आणि अभि फिल्म्स निर्मित 'इबलिस' सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन देखील राहुल चौधरी यांनी केलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून इबलिस सिनेमाचा लोगो अनावरण करण्यात आला. सिनेमाचा लोगो हा सिनेमा नक्की काय आहे हे सांगण्याची पहिली पायरी असते. सिनेमाची कन्सेप्ट, गोषवारा म्हणजेच एकंदरीत ओळख दाखविण्याचे काम सिनेमाचा लोगो करत असतो असे राहुल चौधरी म्हणाले. विविध सोशल माध्यमांतील प्रतिक्रिया पाहता इबलिस सिनेमाचा लोगो उत्सुकता वाढवत आहे. 'धक्का लागी बुक्का' अशी दमदार पंचलाईन असलेला हा सिनेमा आता "लवकरच होणार लढाई" असे म्हणत या २०१८ मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उमेश-तेजश्रीने आव्हानात्मक भूमिका वठवण्यासाठी केले खास वर्कशॉप