Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी घातलेला रिंकू राजगुरूचा फोटो व्हायरल!

rinku rajguru
, शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (18:38 IST)
Instagram
सैराट या चित्रपटातून आर्ची नावाने प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री  रिंकू राजगुरू ने सैराट चित्रपटाने अभिनयाचा ठसा मिळवला. कागर, मेकअप, आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली. रिंकू ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.  

ती नेहमी आपले फोटो पोस्ट करत असते. सध्या तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये तिने हिरवी रंगाची साडी नेसली असून गळ्यात मंगळसूत्र घातलं असून पायात जोडवी दिसत आहे. तिचा हा असा फोटो पाहून चाहते आश्चर्य करत आहे. रिंकूचा हा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. 
रिंकूचा हा फोटो तिच्या आगामी चित्रपट आशातील नव्या लुकचा आहे. तिने या चित्रपटाचे शुंटिंग पूर्ण केलं असून चित्रपटाची आठवण म्हणून हा फोटो शेअर केला आहे. रिंकूचा या फोटोनं चाहत्यांचे लक्ष वेधले असून रिंकूचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे. रिंकू या पूर्वी झुंड या चित्रपटात दिसली होती. आता ती लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. 
 


Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rajinikanth Temple रजनीकांतच्या चाहत्याने तामिळनाडूमध्ये बांधले अभिनेत्याचे मंदिर, देवासारखी पूजा होते