Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 29 March 2025
webdunia

चला हवा येऊ द्या शो मध्ये रितेश आणि जेनेलिया

चला हवा येऊ द्या शो मध्ये  रितेश आणि जेनेलिया
, गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (10:43 IST)
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मराठी शो चला हवा येऊ द्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता या शोमध्ये बॉलिवूड विश्वातील एक क्यूट कपल हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. सर्वांचा आवडता मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया डिसूझा हे शोमध्ये दिसणार आहे.
 
आता रितेश आणि जेनेलिया डिसूझा- देशमुख या शोमध्ये का येणार आहेत आणि नेमकं काय करणार आहे हे अद्याप समोर आलेले नाही. पण शो मध्ये बघण्यासाठी प्रेक्षक मात्र अत्यंत उत्सुक आहे.
 
या शो मध्ये निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे आणि कुशल बद्रिके यांची धमाल असते. बॉलिवूडमधील क्यूट कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा 9 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्नाच्या बंधनात अडकले. आधी 9 वर्षे आता संसारीची यशस्वी 9 वर्षे असी 18 वर्षे एकत्र पूर्ण केली आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या सपना चौधरी विरोधात वॉरंट जारी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण