Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मलिष्काच्या 'गेली गेली मुंबई खड्ड्यात' गाण्याची जोरदार चर्चा

मलिष्काच्या 'गेली गेली मुंबई खड्ड्यात' गाण्याची जोरदार चर्चा
आरजे मलिष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलिष्काचं खड्ड्यांवरचं गाणं सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. सैराट सिनेमातील झालं झिंग झिंगाट गाण्याच्या धर्तीवर मलिष्कानं 'गेली गेली मुंबई खड्ड्यात' गाणं तयार केलं आहे. सध्या हे गाणं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अवघ्या काही तासांच्या पावसानं मुंबईची होणारी तुंबई, त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे होणारे हाल, यावर मलिष्कानं गाण्यातून भाष्य केलं आहे. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 
 
गेल्या वर्षी मलिष्कानं उपहासात्मक गाण्यातून बीएमसीवर निशाणा साधला होता. त्या गाण्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं मलिष्कावर जोरदार टीका केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमानने हाथी भाईना अशी केली होती मदत