Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'आम्ही जरांगे'...मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर...

'आम्ही जरांगे'...मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर...
, बुधवार, 17 एप्रिल 2024 (12:44 IST)
नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित 'आम्ही जरांगे - गरजवंत मराठयांचा लढा' हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  नुकताच या चित्रपटाचा लोगो लाँच करण्यात आला.   
 
'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सुरेश पंडित यांचे असून मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक वेगळीच पर्वणी असणार आहे. 
 
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच "गरजवंत मराठ्यांचा लढा" हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. त्यामुळे अर्थातच 'आम्ही जरांगे' या चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रदर्शना आधीपासूनच शिगेला पोहचली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शोले चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना उच्च न्यायालयाचा धक्का, याचिका फेटाळली; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या