Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सावरकरांना2014 नंतर लक्ष्य केलं जात आहे- शरद पोंक्षे

सावरकरांना2014 नंतर लक्ष्य केलं जात आहे- शरद पोंक्षे
, रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (10:29 IST)
2014 नंतर सावरकरांना सतत लक्ष्य केलं जात आहे. दुसरं कुठलंच नाव येत नाही. हिंदुत्ववादी अनेक नेते होऊन गेले पण त्यांना लक्ष्य केलं गेलं नाही. मात्र, सावरकरांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जातंय असं अभिनेते शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. 
 ते पुढे म्हणाले, "सावरकरांनी एक कणभरही हिंदुत्वाला तिलांजली दिली नाही. हिंदुत्वाच्या भल्यासाठी मी काम करीत राहणार अशीच सावरकरांची भूमिका होती. बाकी इतर हिंदुत्ववाद्यांनी राजकारणासाठी कुठंतरी तोडजोडी केल्या, हिंदुत्वासाठी तडजोड केल्या. पण सावरकरांनी नाही केली."
"सावरकर हे भारतरत्नच नाहीत तर विश्वरत्न आहेत. मात्र, सावरकरांवर शिंतोडे उडवायचे असं करुन सावरकरांना बदनाम केलं जात आहे. 80 टक्के हिंदूंना दुखवायचे असेल तर सावरकरांना बदनाम करायचे, हे काम सुरू आहे," असं पोंक्षे म्हणाले.
 
"कट्टरता हिंदूंमध्ये येऊ शकत नाही. जिथं नियम येतात, घटना येते तिथं कट्टरता येते. हिंदू धर्मामध्ये ही भानगड नाही. कारण मुळात धर्म आहे. इतर धर्मसंस्था आहेत. त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार धर्मसंस्थांची निर्मिती केली. देवाला शिव्या देणारा, नास्तिक असतानाही तो हिंदूच असतो," असं त्यांनी सांगितलं.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ही मालिका घेणार निरोप