Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शर्वाणी करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण

शर्वाणी करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण
, शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (14:54 IST)
‘अवंतिका' मालिकेतील सानिका असो, ‘आंबट गोड' मधली इंदू असो, ‘स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील आदरणीय सकवारबाई असो, अगदी सध्या चालू असलेल्या ‘ मुलगी झाली हो' मालिकेतील उमा असो अशा विविध मालिका तसेच विविध नाटक, चित्रपट अशा तीनही माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री लेखिका शर्वाणी पिल्लई आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
 
पॅलेट मोशन पिक्चर्स असे तिच्या निर्मिती संस्थेचे नाव असून शर्वाणी पिल्लई आणि लेखक,दिग्दर्शक सुश्रुत भागवत हे या निर्मिती संस्थेचे निर्माते आहेत. वर्दे आणि सन्स या आगामी लोकेश गुप्ते दिग्दर्शित वेब सीरिजची निर्मिती पॅलेट मोशन पिक्चर्स करत असून अभिजित खांडकेकर, उपेंद्र लिमये, रमेश श्रीवर्धन, दीपक करंजीकर अशी दमदार कलाकार मंडळी या वेबसीरिजच्या माध्मातून  आपल्या भेटीस येणार आहेत. प्लॅनेट मराठीवर ही वेबसीरिज आपल्याला पाहता येणार आहे. आपल्या नव्या इनिंगविषयी शर्वाणी म्हणते,  2014 साली प्रदर्शित झालेला ‘सौ शशी देवधर' हा मी आणि सुश्रुत भागवत यांनी एकत्र लिहिलेला पहिला सिनेमा आहे. सध्या ह्या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन चालू असून आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच भेटीस येणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करीनाने आपल्या लहान मुलाबरोबर सैफ आणि तैमूरचा खेळत असलेला फोटो शेअर केला, लिहिले- 'असा दिसतो माझा..'