Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्ली इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीव्हलमध्ये ‘अनुप जत्राटकर मल्टिमीडिया प्रोडक्शन’ सर्वोत्कृष्ट

दिल्ली इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीव्हलमध्ये ‘अनुप जत्राटकर मल्टिमीडिया प्रोडक्शन’ सर्वोत्कृष्ट
कोल्हापूर , शनिवार, 3 डिसेंबर 2016 (16:59 IST)
‘माझं लगीन हलगीसंगं..’ ठरला महिला सक्षमीकरणाबाबतचा सर्वोत्कृष्ट लघुपट
 
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या दिल्ली इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीव्हलमध्ये येथील ‘ अनुप जत्राटकर मल्टीमीडिया प्रोडक्शन’ला ‘बेस्ट फिल्म प्रोडक्शन हाऊस इन इंडिया’ हा पुरस्कार जाहीर झाला. मासिक पाळीच्या अनुषंगाने महिलांच्या मानसिकतेचा वेध घेणाऱ्या ‘मक्तुब’ या लघुपटासाठी हा पुरस्कार मिळाला.
 
येथील गजलक्ष्मी टेलिफिल्म्स आणि  अनुप जत्राटकर मल्टिमीडिया प्रोडक्शन यांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘मक्तुब’ या लघुपटाला दिल्ली फेस्टीव्हलमध्ये एकूण १२ नामांकने मिळाली होती. महोत्सवात सहभागी १५२ प्रोडक्शन हाऊसेसमधून बेस्ट प्रोडक्शन हाऊसचा पुरस्कार या संस्थेला प्राप्त झाला. तसेच गजलक्ष्मी टेलिफिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘माझं लगीन हलगीसंगं..’ या लघुपटाला महिला सक्षमीकरणासंदर्भातील सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.
webdunia
दरम्यान, ‘मक्तुब’ हा अनुप जत्राटकर प्रोडक्शन हाऊसतर्फे निर्माण करण्यात आलेला आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात पुरस्कार प्राप्त करणारा सलग दहावा लघुपट ठरला आहे. गेल्या आठ वर्षांत या प्रोडक्शन हाऊसतर्फे निर्माण करण्यात आलेल्या इपिफनी ऑफ गॅलिलिओ (२००८), डब्ल्यू (२००९),   लिस्ट (२००९), समर (२००९), क्षितीज (२००९), डॉक्टर, जस्ट बिकॉझ ऑफ यू.. (२०१०), पंचगंगा (२०११), द प्रॉमिस (२०१३) आणि स्मोकिंग झोन (२०१५) या लघुपटांनी विविध महोत्सवांतून पुरस्कार प्राप्त केले आहेत. स्त्री भ्रूण हत्येवरील ‘द प्रॉमिस’ या लघुपटाचे आजतागायत तीनशेहून अधिक डिमांड शो झालेले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'पद्मावती'च्या सेटवर रणवीरचे आहे हे SPECIAL नाव