rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘आम्ही दोघे राजाराणी’ सहकुटुंब अनुभवावं असं निखळ मनोरंजन

star pravah
, बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (15:55 IST)
दोन विविध याक्तीरेखाची माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा सॉलिड फ्रिक्शन तयार होते, या दोघांची लव्हस्टोरी देखील धम्माल असते. स्टार प्रवाहवर 'आम्ही दोघे राजा राणी' या मालिकेतून अशीच एका गोड जोडीची लोभस प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
  
webdunia
पार्थ आणि मधुरा हे दोन राजा राणी या मालिकेत असून ही दोघेही आपापल्या अतरंगी कुटुंबासोबत राहतात. एकत्र कुटुंबात वाढणाऱ्या या दोघांचे त्यांच्या कुटुंबावर अतोनात प्रेम आहे पण त्यांचे नमुनेदार कुटुंबिय या दोघांच्या प्रेमकहाणीत जबरदस्त तडका देणार आहेत. दोघांच्या राजाराणीच्या संसारात त्यांची कुटुंब काय करामती करतायत हे अतिशय मनोरंजक आणि तितक्याच खुमासदारपणे मांडण्यात आलं आहे. या दोघांची हटके भेट,त्या भेटीचे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात कसे रुपांतर होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रेमाची गुलाबी छटा असलेली ही रोमँटिक  कॉमेडी मालिका संपूर्ण कुटुंबासह पहावी अशी आहे. 
webdunia
संगीता राकेश सारंग यांच्या 'कॅम्सक्लब'ने या मालिकेची निर्मिती केली आहे. विजय पटवर्धन, समीर चौघुले आणि अभिजित पेंढारकर मालिकेचं लेखन करत असून, संचित वर्तक दिग्दर्शन करत आहेत. मंदार कुलकर्णी, दीप्ती लेले या देखण्या गोंडस जोडी सोबत मिलिंद फाटक, विनय येडेकर, मैथिली वारंग, सुलेखा तळवलकर,शीतल शुक्ल आदी विनोदी अभिनायात मुरब्बी  कलाकार यातील भूमिका साकारत आहेत. विनय येडेकर 'विकता का उत्तर' हा हटके गेम शो, 'गोठ',‘ग....सहाजणी’ आणि 'नकुशी... तरीही हवीहवीशी' या तीन मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे 'आता थांबायचं नाय' म्हणत 'स्टार प्रवाह' उत्तम आशय आणि निखळ मनोरंजनासाठी 'आम्ही दोघं राजा राणी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे.त्याचे प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील असा स्टार प्रवाह वाहिनीला विश्वास आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डियर जिंदगीसोबत रईसचे ट्रेलर