Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सूरज चव्हाण लवकरच अडकणार लग्नबंधनात

Suraj Chavan
, सोमवार, 10 नोव्हेंबर 2025 (18:01 IST)
facebook social media
बिगबॉस मराठीच्या 5 पर्वा चे विजेता सुरज चव्हाण लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. त्याच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहे. आता त्याचा लग्नाची तारीख आणि ठिकाणाची माहिती मिळाली आहे. 
सुरज चव्हाण संजनाशी लग्नगाठ जोडणार आहे. येत्या 29 नोव्हेंबर रोजी सुरज आणि संजना लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. सुरज आणि संजनाच्या लग्नाचा सोहळा पुण्याजवळील जेजुरी, सासवड येथे होणार आहे. 
 ALSO READ: अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप केला साखरपुडा, या राजकीय घराण्याची होणार सून
संजना ही सुरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. हे सुरजचे लव्ह मॅरेज आहे. ते लहानपणापासून एकमेकांना ओळखतात.आता ते दोघे वैवाहिक बंधनात अडकणार आहे. लग्नाच्या पूर्वीचे सर्व विधी 28 नोव्हेंबर पासून सुरु होणार असून हळद, मेहंदी संगीत हे सर्व कार्यक्रम होणार आहे.
हे सर्व कार्यक्रम त्याच्या नव्या घरात होणार आहे. त्यासाठी नवीन घरात सजावट करण्यात आली आहे. 
सुरज बिगबॉस 5 मराठी या रिऍलिटी शो मधून प्रेक्षकांचा घरात पोहोचला. या शोचा तो विजेता ठरला. प्रेक्षकांना त्याच्या लग्नाबद्दल खूप उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आणि चेहरा दिसला होता. आता त्याच्या लग्नाची वेळ आणि तारीख समोर आली आहे.   
Edited By - Priya Dixit   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

८९ वर्षीय 'ही-मॅन' धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल; कुटुंबाने दिले 'हे' स्पष्टीकरण