Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वप्नील जोशी स्पेशल : श्रीकृष्ण ते विनोदी अभिनेता स्वप्नील जोशी

swapnil joshi
, सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (10:39 IST)
अभिनेता स्वप्नील जोशी, लहानग्या वयापासून प्रसिद्ध टीव्ही शोमध्येच दिसला, त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना भुरळ घातली.स्वप्नीलचा वाढदिवस 18 ऑक्टोबर रोजी असतो. 

स्वप्नीलला भगवान कृष्णाच्या भूमिकेमुळे ओळखतात. रामानंद सागर यांच्या सुपरहिट सीरियल 'श्री कृष्णा'मध्ये त्याने  भगवान कृष्णची भूमिका साकारली, या पूर्वी त्याने वयाच्या 9व्या वर्षी 'रामायण' या टीव्ही शोमध्ये भगवान रामाचा मुलगा कुशची भूमिकाही साकारली होती. स्वप्नील चाळीत रहायचा.लहानपणापासून चाळीत होणाऱ्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचा. तसेच तो शाळेतील नाटके आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा.

स्वनील नाटकात काम करत असताना 'श्री कृष्ण' या मालिकेत कंसाची भूमिका साकारणारा अभिनेता विलास राव यांची दृष्टी त्याच्यावर पडली. त्यांनी  स्वप्नीलच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांच्यासोबतचा फोटो काढला. काही दिवसांनी सागर आर्ट्स प्रॉडक्शन हाऊसमधून त्यांना फोन आला. त्याने ऑडिशन दिले आणि कुशच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली.या शिवाय स्वप्नील एक चांगला विनोदी अभिनेता  देखील आहे.स्वप्नील ला कॉमेडी सर्कस महासंग्रामचा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे.
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रणबीर पाठोपाठ आलियानेही केला चित्रपटातून ब्रेक घेण्याचा प्लॅन!