rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वप्नील जोशीची 'समांतर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Swwapnil Joshi
, शनिवार, 19 जून 2021 (12:55 IST)
स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या 'समांतर'ने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. सिझन १ मध्ये स्वप्नील जोशीने (कुमार महाजन) नितेश भारद्वाजचा (सुदर्शन चक्रपाणी) शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चक्रपाणी यांनी त्यांचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारच्या स्वाधीन केली होती. त्यानुसार कुमारच्या आयुष्यात काही गोष्टी घडतही होत्या आणि एका मनोरंजक वळणावर येऊन ही कथा संपली होती. जिथे कुमारचे भविष्य स्पष्ट दिसत होते. त्यामुळे साहजिकच समीर विध्वंस दिग्दर्शित 'समांतर २' ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती, ती यात आता पुढे काय पाहायला मिळणार याची. ही उत्सुकता अधिक न ताणता एमएक्स प्लेअरने 'समांतर २'चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. 
 
  दोन व्यक्ती, एका आयुष्यात दोन वेगळ्या काळात सारख्याच नशिबाचा सामना करत आहेत. चक्रपाणीचा भूतकाळ कुमारचा भविष्यकाळ ठरवू शकेल? हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागेल. तत्पूर्वी प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी मराठी एमएक्स ओरिजिनल 'समांतर २'चा ट्रेलर २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

HBD: बॉलीवूडमध्ये फ्लॉप पण दक्षिणेत हिट अभिनेत्री काजल अग्रवाल, लक्झरी जीवनाची आवड आहे