Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तेजस्वी प्रकाशचा 'मन कस्तुरी रे' चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज

tejasswi prakash
, मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (18:42 IST)
टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश नेहमी तिच्या कामा बद्दल चर्चेत असते. तिने आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांवर चांगली छाप सोडली आहे. ती लवकरच छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मन कस्तुरी रे चित्रपटातून ती मराठी पडद्यावर देखील झळकणार आहे. मन कस्तुरी रे या चित्रपटातील तिचे फर्स्ट लूक रिलीज झाले आहे. ती या चित्रपटात श्रुती नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. तिच्या सोबत अभिनय बेर्डे हा अभिनेता देखील झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आत्तीली आणि मृत्युंजय किचम्बरे यांनी केली असून ईमेन्स डायमेन्शन इंटरटेन्मेन्ट आर्टस् प्रोडक्शन चे आहे.सह निर्माता निशिता केणी आणि करणं कोंडे यांचा ड्रॅगन वॉटर फिल्म्स आहे. 
या चित्रपटात अभिनय बेर्डे आणि तेजस्वीची लव्ह केमेस्ट्री दिसणार आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संकेत माने आहेत. या चित्रपटातून ती रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे. तिचा या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला असून तिचा बबली आणि रॉकिंग अंदाज प्रेक्षकांना आवडत आहे. 4 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.   
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah नवीन तारक मेहताची एन्ट्री, पाहा प्रोमोमध्ये सचिन श्रॉफची झलक