Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्वी ने केला धक्कादायक खुलासा

webdunia
, मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (13:48 IST)
मराठमोळी अभिनेत्री सौंदर्यवती तेजस्विनी पंडित ने धक्कादायक खुलासा केला. अभिनेत्रीने पुण्यात तिच्यासोबत घडलेल्या प्रकरणाबद्दल सांगितले आहे. अभिनेत्रीने सांगितले की ही घटना 2009-10 मध्ये घडली जेव्हा ती पुण्यातील सिंहगड रोडवर भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. त्यावेळी ती खूप स्ट्रगल करत होती. फक्त एक-दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते, त्यानंतर त्याच्या घरमालकाने जो एक नगरसेवक होता त्याने थेट तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली.
 
तेजस्विनीने मुलाखतीत सांगितले की, तो काळ खूप वाईट होता. ती म्हणते की, मी जेव्हा पुण्यात सिंहगडरोड वर भाड्याच्या अपार्टमेंट मध्ये राहत असताना अपार्टमेंटच्या मालक असलेल्या एका नगरसेवकाने  मी त्याचे घरभाडे देण्यासाठी त्याच्या ऑफिस मध्ये गेले असताना त्याने मला थेट ऑफर देत शारीरिक सुखाची मागणी केली. मला राग आला आणि मी टेबलावरचा पाण्याचा ग्लास उचलून त्याच्या तोंडावर पाणी फेकत 'मी असा गोष्टी करण्यासाठी या क्षेत्रात प्रवेश केलेला नाही, अन्यथा मी भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहिले नसते, माझ्या दारी गाड्या उभ्या असत्या. असं सुनावले. माझे व्यवसाय आणि माझी आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे त्याने असं म्हणायचे धाडस केले. ही घटना माझ्यासाठी जणू एक शिकवणं होती. 

अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या त्या कन्या असून तेजस्विनीने अगं बाई अरेच्चा' केदार शिंदेच्या चित्रपटाउन पदार्पण केले.या शिवाय मी सिंधुताई सपकाळ, एकतारा, तू ही रे, देवा या चित्रपटात अभिनय केले आहे. लज्जा आणि एकाच या जन्मी जणू या मालिकेत देखील तिने अभिनय केले असून रानबाजार, समांतर या वेब्सिरीज गाजवल्या आहे. तेजस्विनीने या घडलेल्या प्रकारची हाती माध्यमांशी बोलताना दिली.  
 
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Vivekananda Rock Memorial विवेकानन्द स्मारक शिला कन्याकुमारी