Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 6 April 2025
webdunia

‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवारी २२ डिसेंबरला झी टॉकीजवर!

maherchi sadee
, शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (12:39 IST)
विजय कोंडके दिग्दर्शित आणि निर्मित ‘लेक असावी तर अशी’ हा कौटुंबिक भावनांनी परिपूर्ण चित्रपट झी टॉकीजवर आपल्या भेटीला येत आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर, रविवार, दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरद्वारे प्रदर्शित होणार आहे.
 
चित्रपटात अनुभवी आणि नवोदित कलाकारांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. गार्गी दातार मुख्य भूमिकेत असून, त्यांच्यासोबत सुरेखा कुडची, यतीन कार्येकर, कमलेश सावंत, ओंकार भोजने, शुभांगी गोखले, सविता मालपेकर, प्राजक्ता हणमघर, अभिजीत चव्हाण, आणि नयना आपटे यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत. 
 
‘लेक असावी तर अशी’ ही कथा प्रेम, जिव्हाळा, आणि कौटुंबिक नात्यांवर आधारित आहे, जी प्रेक्षकांना भावनिक अनुभव देईल. विजय कोंडकेंच्या ‘माहेरची साडी’ या सुपरहिट चित्रपटानंतर हा त्यांचा आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 
 
झी टॉकीज नेहमीच दर्जेदार कौटुंबिक चित्रपटांची मेजवानी देत असते, आणि ‘लेक असावी तर अशी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाचा खास अनुभव घेता येईल.
 
झी टॉकीज चे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर म्हणाले , " झी टॉकीजवर ‘लेक असावी तर अशी’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. विजय कोंडके यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट कौटुंबिक मूल्ये, प्रेम, आणि नात्यांची हृदयस्पर्शी कथा मांडतो. प्रेक्षकांना या चित्रपटाद्वारे एक भावनिक आणि समृद्ध अनुभव मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. झी टॉकीज नेहमीच दर्जेदार आणि मनोरंजक चित्रपट आपल्या प्रेक्षकांसाठी आणण्यास वचनबद्ध आहे, आणि ‘लेक असावी तर अशी’ हा चित्रपट त्याच परंपरेचा एक भाग आहे.”
 
झी टॉकीजवर, रविवार, २२ डिसेंबर रोजी, दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता जरूर पाहा ‘लेक असावी तर अशी’!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

15 व्या दिवशी देखील अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ने केला 1500 कोटींचा टप्पा पार