Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Timepass 3- 'टाइमपास ३’टीमने धरला रिक्षाचालकांसोबत ठेका

timepass 3
, गुरूवार, 28 जुलै 2022 (15:51 IST)
सध्या 'टाइमपास३' चा सर्वत्र बोलबाला आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. त्यापैकीच एक ट्रेंडिंग गाणे म्हणजे 'वाघाची डरकाळी'. नुकताच ठाण्यातील रिक्षा स्टँडवर हृता दुर्गुळे, प्रथमेश परब, मनमीत पेम यांनी या गाण्यावर ठेका धरला. यावेळी त्यांना रिक्षाचालकांनीही साथ दिली. विशेष म्हणजे यात काही महिला रिक्षाचालकही होत्या. या प्रसंगी दिग्दर्शक रवी जाधवही उपस्थित होते.
 
क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबध्द केलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर हे गाण्याला वैशाली सामंतचा ठसकेबाज आवाज लाभला आहे. झी स्टुडिओज आणि अथांग कम्युनिकेशन्स निर्मित, रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास ३’ येत्या २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री गजानन महाराजांचे शेगाव