मित्र आणि भवितव्य या आयुष्यातील संलग्न असणाऱ्या गोष्टींवर भाष्य करणारा 'यारी दोस्ती' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खऱ्या मैत्रीची व्याख्या मांडणाऱ्या या चित्रपटाच्या प्रमोशनल गाण्याचे आजीवासन स्टुडियोमध्ये नुकतेच रेकॉर्डिंग करण्यात आहे. तरुणांचा लाडका गायक अवधूत गुप्ते याच्या आवाजात रेकॉर्ड झालेले हे गाणे, संजय वारंग यांनी लिहिले असून, यात अस्सल मैत्रीचा सार दिसून येतो. आजच्या तरुण पिढीची बोलीभाषा टिपणारे हे गाणे प्रत्येकाला आपल्या मित्राची आठवण करून देतो. सचिन-दीपेश जोडीने लयबद्ध केलेल्या या गाण्यावर प्रेक्षक ठेका देखील धरतील. मैत्रीचे बंध जपणारे हे गाणे 'यारी दोस्ती'चा रंग अधिक गडद करण्यास पुरेसा ठरेल ही खात्री आहे.
बिपीन शाह मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि पॅशनवल्ड एंटरटेनमेंट्स निर्मित 'यारी दोस्ती' हा सिनेमा शांतनू अनंत तांबे यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून तयार झाला आहे. यात हंसराज जगताप, आकाश वाघमोडे, आशिष गाडे, सुमित भोकसे हे प्रमुख कलाकार असून संदीप गायकवाड, मिताली मयेकर, नम्रता जाधव, श्रेयस राजे, निशा परुळेकर, अशोक पावडे, जनार्दन सिंग आणि मनीषा केळकर यांच्यादेखील ठळक भूमिका पहायला मिळणार आहेत.