Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'एमचॅम्प'द्वारे संतोष जुवेकर भेटणार चाहत्यांना

'एमचॅम्प'द्वारे संतोष जुवेकर भेटणार चाहत्यांना
, गुरूवार, 1 सप्टेंबर 2016 (10:57 IST)
पुणेकर नागरिकांच्या घरात आणि मनामनात मनोरंजन आणि मौजमजा थेट पोचवत असताना सेलिब्रिटी आणि मौजमजा आधारित एमचॅम्प या अॅपने ‘आपला आवडता नट’ ही  मराठी तारे-तारका आणि सेलिब्रिटींवरील स्पर्धा आणली आहे. एखाद्या विशिष्ट ताऱ्यावर असणाऱ्या या स्पर्धेत संबंधित सेलिब्रिटीबाबत मनोरंजक प्रश्न आणि पोल असणार आहेत. 
 
‘आपला आवडता नट’ एमचॅम्प स्पर्धा ही मराठी तारे-तारकांशी संबंधित असेल. ती त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील चाहत्यांशी त्यांना जोडेल. प्रत्येक सेलिब्रिटीवरील प्रत्येक स्पर्धा 100 दिवस चालेल. ही स्पर्धा चाहत्यांना तारे-तारकांना भेटण्याची, शूटिंगच्या ठिंकाणी किंवा चहा/कॉफी / डिनरकरिता त्यांना भेटण्याची संधी देते तसेच दररोज, साप्ताहिक आणि मासिक बक्षीस जिंकण्याचीही संधी देते.
 
एमचॅम्प एन्टरटेनमेंटचे उपाध्यक्ष फाल्गुन मिस्त्री म्हणाले, “‘आपला आवडता नट’ ही स्पर्धा चाहते आणि सेलिब्रिटींना एकमेकांच्या अधिक जवळ आणते, तेही खेळीमेळीच्या पद्धतीने. पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद व कोल्हापूर अशा शहरांमधील चाहत्यांना तारे-तारकांना भेटून त्यांना शुभेच्छा देण्याच्या 4-5 संधी मिळवून देण्याचे आमचे लक्ष्य आहे.”
 
‘आपला आवडता नट’ स्पर्धा ही मराठी चित्रपटांतील आघाडीचा स्टार संतोष जुवेकरसोबत सोबत सुरू होत आहे. त्याचा स्वतःचा असा मोठा चाहतावर्ग असून सर्वाधिक मागणी असलेल्या मराठी सेलिब्रिटींपैकी तो एक आहे.  ही स्पर्धा संतोष आणि त्याच्या चाहत्यांना मजेशीर आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने एकत्र आणते - ती मोबाईल प्लॅटफॉर्म एमचॅम्पच्या माध्यमातून. या स्पर्धेत त्याच्या चाहत्यांसाठी दररोज 1  मतप्रदर्शनाचा प्रश्नही असून येत्या 100 दिवसांमध्ये संतोष  जुवेकरला भेटण्याच्या 4 संधी असतील. उदा. पुण्यातील आगामी गणेशोत्सवात संतोष जुवेकर आपल्या चाहत्याच्या घरी आरतीसाठी (भाग्यवान विजेत्याच्या) जाईल तसेच पुण्यातील आपल्या 50 हून अधिक चाहत्यांना भेटेल. अशाच प्रमाणे येत्या 100 दिवसांमध्ये चाहत्यांना तारे-तारकांसोबत वेळ घालविण्याची अधिक संधी मिळेल.
 
फाल्गुन मिस्त्री यांच्या मते, ’आपला आवडता नट’ तसेच यासारख्या स्पर्धांद्वारे एमचॅम्प मोबाईलच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटींना अधिक संपर्कात आणते. मतप्रदर्शन पोल्ससह तारकांच्या स्पर्धा घेण्याचा हा अभिनव आणि एकमेवाद्वितीय प्रकार आहे. आतापर्यंत सिनेमा आणि टीव्हीच्या माध्यमातूनच ज्या सेलिब्रिटींना चाहते जाणत होते, त्यांना जाणण्याची आणि मोबाईलद्वारे संवाद साधण्याची आणि भेटण्याची संधी त्यांना मिळत आहे.
 
‘आपला आवडता नट’ स्पर्धा आणि यातील आपला सहभाग, या बाबत संतोष जुवेकर म्हणाला, “माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझ्या कामाला दाद देणाऱ्या चाहत्यांचा मी नेहमीच कृतज्ञ आहे. चित्रपट आणि टीव्हीच्या माध्यमातून आम्ही नेहमीच भेटत आलो आहोत, परंतु  एमचॅम्पवरील ‘आपला आवडता नट’ स्पर्धेद्वारे पहिल्यांदाच मोबाईल प्लॅटफॉर्मवर दररोज मी प्रत्यक्ष माझ्या चाहत्यांशी भेटणार आहे. या माध्यमातून मी माझ्या चाहत्यांना अधिक चांगल्या प्रकारे जाणू शकणार आहे  आणि तेही मला जाणतील. याची सुरूवात करण्याकरिता गणेशोत्सवापेक्षा अधिक चांगला मूहूर्त कोणता असू शकेल?”
 
तो पुढे म्हणाला, की गणेशोत्सवात बाप्पाच्या आरतीसाठी मी पुण्यात विजेत्याच्या घरी जाणार आहे. तसेच विविध शहरांतील माझ्या चाहत्यांना भेटण्याच्या अधिक मनोरंजक आणि नाविन्यपूर्ण पद्धतीची वाट पाहीन.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

किंग खानवर फिदा आलिया!