Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कधी येणार ‘शांताबाई’चं अधिकृत व्हिडिओ साँग

कधी येणार ‘शांताबाई’चं अधिकृत व्हिडिओ साँग
, बुधवार, 14 ऑक्टोबर 2015 (10:45 IST)
शांताबाई या गाण्याने सोशल नेटवर्किगवर अनेक विक्रम मोडित काढले आहेत. शांताबाई या गाण्यावर यू-ट्यूब तसेच व्हॉटस अँपवर भलताच डान्स मॅच करून व्हिडिओ पसरवला जात आहे. अर्थात आता शांताबाई गाण्यावरील डान्सचा फॉर्मेट किंवा अधिकृत व्हिडिओची निर्मिती करण्याची वेळ आली आहे.
 
अर्थात शांताबाईचं अधिकृत व्हिडिओ साँग यू-ट्यूबला आणण्यासाठी सुमित म्युझिकला पुढाकार घ्यावा लागणार आहे. तसेच संगीतकार, गीतकार संजय लोंढे यांचीही या व्हिडिओ साँगमध्ये भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यू-ट्यूबच्या महत्त्वाच्या संगीत व्हिडिओमध्ये शांताबाईचा व्हिडिओ ट्रेडिंग आहे, शांताबाई गाण्याचं जर अधिकृत व्हिडिओ साँग आलं तर आणखी धमाल होणार आहे. यामुळे एखाद्या अभिनेत्रीला पुन्हा नावारूपाला येण्याची संधी आहे. शांताबाई गाण्यातील भाषा ज्यांना कळत नाही, त्या राज्यातही संगीताच्या तालावर शांताबाई लोकप्रिय झाली आहे. ज्याप्रमाणे कोलावरी-डी आणि कोडाईकनालचं प्रोटेस्ट साँग लोकप्रिय झालं होतं, त्याप्रमाणे शांताबाई लोकप्रिय झाली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi