Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काजोल-अजय पुन्हा एकाच सिनेमात?

काजोल-अजय पुन्हा एकाच सिनेमात?
सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टीने अजय देवगण आणि काजोल या रियल लाइफ कपलला घेऊन कॉमेडी ड्रामा सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 
 
अजय देवगण आणि काजोल यांनी याआधीही रोहित शेट्टीसोबत काम केले आहे. रोहित-अजयच्या जोडीने तर ‘गोलमाल’ आणि ‘सिंघम’सारखे सुपरहिट सिनेमेही केले आहेत,तर काजोलने ‘दिलवाले’ सिनेमात रोहितसोबत काम केलं आहे. 
 
रोहितला जेव्हा विचारण्यात आलं की, अजय-काजोल जोडीला घेऊन कोणता सिनेमा करण्याचा विचार आहे का? त्यावर रोहित म्हणाला, सध्या अजय-काजोलला घेऊन सिनेमा करण्यासाठी कोणताही चांगला विषय माझ्याकडे नाही. मात्र, या जोडीला घेऊन फॅमिली कॉमेडी बनवू शकतो. शिवाय, सिनेमातही या दोघांना पती-पत्नीच दाखवायला हवं. दरम्यान, अजय देवगण सध्या ‘शिवाय’ सिनेमात व्यस्त असून, दिवाळीमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. ‘शिवाय’ सिनेमा अजय देवगणसाठी खास अशासाठी आहे की, या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. तर काजोलही नवा सिनेमा करण्याच्या तयारीत आहे. ‍िफल्ममेकर राकेश सांघवींच्या सिनेमात काजोल दिसण्याची शक्यता आहे. 
 
अजय देवगण आणि काजोल दोघेही आपापल्या सिनेमात व्यस्त असले, तरी या दोघांनी लवकरात लवकर एका सिनेमात काम करावं, असंही दोघांच्या चाहत्यांना मनोमन वाटतं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रियंकाची रोजची कमाई दीड कोटी