कजाग सासू आणि तिला तिच्याच भाषेत प्रत्युत्तर देणारी सून यावर आधारित मालिका नांदा सौख्य भरे लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय.
मालिका सुरु झाल्यानंतर नील आणि स्वानंदीच्या जोडीला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली होती. मात्र ही जोडी आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ही मालिका संपतेय. एक ऑक्टोबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे.
या मालिकेच्या जागी 2 ऑक्टोबरपासून तुझ्यात जीव रंगला ही मालिका सुरु होतेय.