Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बोल्ड आणि ब्यूटीफुल सईची आंतरराष्ट्रीय भरारी

बोल्ड आणि ब्यूटीफुल सईची आंतरराष्ट्रीय भरारी
मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि ब्यूटीफुल अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. ‘हंटर’ चित्रपटाद्वारे सईने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. 
 
आता मराठमोळी सई चक्क आंतरराष्ट्रीय भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. बॉलिवूडच्या काही दिग्गज कलाकारांसोबत सई ‘लव्ह सोनिया’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार असल्याचं समजतंय. ‘स्लमडॉग मिलेनिअर’फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो, अनुपम खेर, पॉल डॅनो, मनोज वाजपेयी, अदिल हुसैन, राजकुमार राव आणि रिचा चढ्ढा आदी कलाकारांसोबत सई ताम्हणकर ‘लव्ह सोनिया’ या हॉलिवूडपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. ‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटाचे निर्माते तब्रेज नुरानी हे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत असून, जयपूर येथे ‘लव्ह सोनिया’च्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रणथंबोर व्याघ्र प्रकल्प