Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुबोध भावे एका नव्या रुपात

सुबोध भावे एका नव्या रुपात

चंद्रकांत शिंदे

PR
सुबोध भावे लवकरच प्रदर्शित होणार्‍या रानभूल चित्रपटात एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. सुबोधने सांगितले, हा चित्रपट व्यक्तीच्या बालमनावर होत असलेल्या संस्कारावर आधारित आहे. माझी यात अत्यंत वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका आहे. माझे लागोपाठ दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि दोन्हीं चित्रपटांमध्ये माझी अत्यत वेगळी भूमिका आहे.

रानभूल मध्ये व्यक्तिच्या सामाजिक, कौटुंबिक, भावनिक, मानसिक जडणघडणीची नाळ त्याच्या बालपणीच्या संस्कारात दडलेली असते. बालमनावर झालेले संस्कार मग ते वाईट असो वा चांगले त्याचे प्रतिबिंब त्याच्या मोठेपणी असणार्‍या व्यक्तिमत्वातून दिसून येतात. रानभूलमध्ये एका युवकावर बालपणी झालेल्या आघाताने जे बदल होतात त्याची कथा म्हणजे हा चित्रपट.

प्रतिभा मेंढेकर यांनी आईशप्पथ चित्रपटानंतर या चित्रपटाची निर्मिती ओंकार एंटरटेनमेंट बॅनरअंतर्गत केली आहे. संजय सूरकर द्वारा दिग्दर्शित या चित्रपटाची कथा गिरीश जोशी यांनी लिहिली आहे. फायनल ड्राफ्ट, माकडाच्या हाती शॅम्पेन या नाटकांच्या यशानंतर गिरीश जोशी यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा प्रयोग केला आहे. संजय सूरकर यांचा हा पहिलाच थरारपट आहे. चित्रपटामध्ये सुबोध भावेबरोबर तेजस्वीनी पंडित नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील अन्य कलाकार आहेत मोहन जोशी, विनय आपटे, उदय टिकेकर, मंगल केंकरे, आशा पाटील, सई रानडे आणि गार्गी दातार. गीतकार आहेत श्रीरंग गोडबोले आणि संगीतकार आहेत नरेंद्र भिडे.

Share this Story:

Follow Webdunia marathi