Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोमवारपासून एनसीपीए मुद्रा डांस सप्ताह

सोमवारपासून एनसीपीए मुद्रा डांस सप्ताह

चंद्रकांत शिंदे

PR
भारतातील प्रमुख कला आणि सांस्कृतिक संस्था नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टसतर्फे सोमवार २६ एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त एनसीपीए मुद्रा डांस वीकचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाच्या माध्यमातून भारतातील नृत्य प्रकारांच्या वारशाचे दर्शन घडविले जाणार आहे. या डांस वीकमध्ये स्त्री-वूमन या संकल्पनेवर भारतातील पाच वैविध्यपूर्ण नृत्यप्रकार सादर केले जाणार आहेत.

एनसीपीए भारतीय नृत्यच्या कार्यक्रम प्रमुख अरुंधती सुब्रमण्यम यांनी वेबदुनियाला सांगितले, एनसीपी मुद्रा डांस वीक हा देशातील नृत्य प्रकारांच्या वैविध्यपूर्णतेचा आणि आधुनिक नृत्य प्रकारांचा उत्सव आहे. प्रेक्षकांना नृत्याचे विविध प्रकार दाखवण्याचा आमचा विचार असतो आणि त्यामुळेच आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पाच दिवस पाच नृत्यकार आपल्या शैलीतील पाच नृत्यप्रकार सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात मात्रिका यांच्या मणिपुरी आणि बिंबावती देवी व त्यांच्या चमूच्या अनुभवामह ने होणार आहे. रवींद्रनाथ टागोर, अरबिंदो आणि बंकिम चंद्र यांच्या रचना तसेच मणिपुरी शास्त्रीय संगीत, मार्शल आर्ट आणि इतर परफॉर्मिंग कला प्रकारातील एका रचनेवर हे नृत्य आधारित आहे. २७ एप्रिलला सीता परित्यागमचे आयोजन कपिला करणार आहे तक २८ एप्रिलला अमृतम नृत्य प्रकार अंदल व मीरा सादर करणार आहेत. २९ एप्रिलला डॉ. नीना प्रसाद आम्रपाली नृत्यप्रकार सादर करणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi