Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केकेआरचा फक्त सल्लागारच राहणार: अक्रम

केकेआरचा फक्त सल्लागारच राहणार: अक्रम

भाषा

नवी दिल्ली , सोमवार, 31 ऑगस्ट 2009 (18:28 IST)
कोलकाता नाइट रायर्डसचा पूर्ण वेळ प्रशिक्षक म्हणून नाही तर फक्त सल्लागार म्हणून काम करण्याची तयारी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने दर्शविली.

केकेआरच्या रिक्त झालेल्या प्रशिक्षक पदासाठी जॉन राईट, रिचर्ड पायबस, संदीप पाटील, प्रवीण आमरे यांच्यासह वसीम अक्रमही स्पर्धेत आहे. यासंदर्भात या सर्वांनी केकेआरचे मालक शाहरुख खान यांच्याशी भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना अक्रम म्हणाला की, आमची बैठक खूप सकारात्मक झाली. सौरव गांगुलीही या बैठकीस उपस्थित होता. आमचा दोघांचा चांगला परिचय असून आम्ही एकमेकांविरुद्ध खूप सामने खेळलो आहे. मी फक्त सल्लागार पदासाठी उपलब्ध असल्याचे बैठकीत सांगितले आहे. '

Share this Story:

Follow Webdunia marathi