Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजयानंतरही धोनीचा पराभव!

विजयानंतरही धोनीचा पराभव!
, शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2015 (10:13 IST)
भारतीय टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजयश्री मिळविला पण टीम ‍इंडियात आजकाल सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत नाही. याचे एक प्रत्यक्ष उदाहरण मैदानात पाहायला मिळाले. भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य राहणे हे एकमेकांत मैदानातच भिडले आणि ताळमेळ नसल्याने कोहली रनआऊट झाला आणि त्याने पॅव्हेलिअनचा रस्ता पकडला.
 
रहाणेने नकार दिल्यानंतरही कोहली दुसर्‍या रनसाठी धावत सुटला़, त्यामुळे तो रन आऊट झाला. राहणेवरून धोनी आणि कोहली यांच्यात पहिल्यापासूनच वाद सुरू आहे. कोहलीचे रन आऊट होणे यात अनेक प्रश्न निर्माण होता आहे. पण टीममधील हा संघर्ष क्षमविण्यास धोनी कमी पडत आहे.
 
शिस्तप्रिय टीम म्हणून ओळखली जाणारी टीम इंडियामध्ये सध्या बेशिस्त वातावरण सुरू आहे. टीममध्ये एकजुटीची कमतरता दिसते आहे. त्यामुळे टीम इंडियावर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. धोनीची शिस्त संपली का? टीम इंडियाचे सदस्य धोनीचे ऐकत नाही का? या प्रश्नांचे उत्तर धोनीलाच द्यावे लागतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi