Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिनच्या भावनांची कदर करा!

सचिनच्या भावनांची कदर करा!
WD
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने सचिनच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित करणार्‍यावर कठोर टीका करताना त्यांना सचिनच्या भावनांची कदर करण्याचे आवाहन केले.

सचिन दीर्घ काळापासून अयशी ठरत असल्यामुळे अनेकांनी भारतीय संघातील त्याच्या स्थानावर प्रश्न उपस्थित केला आहे, परंतु सचिनचा भाजी सहकारी असलेल्या कुंबळेने त्याची पाठराखण करताना सचिनवर हव वेळ टीका करण्याची नव्हे, तर त्याचे समर्थन करण्याची असल्याचे मत व्यक्त केले.

कुंबळेने 'वीक' मासिकातील आपल्या स्तंभात‍ लिहिले, की सचिनने अनेकवेळा संघाला एकहाती विजय मिळवून दिला, परंतु भारताच्या पराभवासाठी तो एकटा कधीच जबाबदार ठरला नाही. त्याची जागा कोणीच घेऊ शकणार नसल्यामुळे सध्याच्या वाईट काळातून त्यालाच मार्ग काढू द्या. कोणत्याच क्रिकेटपटूने 192 कसोटी सामने खेळले नाही किंवा 100 शतकेही ठोकले नाहीत. सचिनचा सन्मान करा, ज्याचा तो हकदार आहे.

कुंबळेने या स्तंभात असेही लिहिले, की गत 23 वर्षांत त्याने लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यात मोलाची भूमिका वठविली. त्यांच्या भावनांची कदर केली. आता आपणही त्याच्या भावनांची कदर केली पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi