Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आकर्षण बनला शाहरुख खानचा छोटा नवाब अबराम

आकर्षण बनला शाहरुख खानचा छोटा नवाब अबराम
, गुरूवार, 9 एप्रिल 2015 (12:52 IST)
आयपीएल -8च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्स (केकेआर)ने मुंबई इंडियंसचा पराभव केला. बॉलीवूड स्टार शाहरुख खानने यंदा  इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या उद्घाटन समारंभात भाग घेतला नाही, पण आपला संघ कोलकाता नाइटराइडर्सचा उत्साह वाढवण्यासाठी तो ईडन गार्डन मैदानात पोहोचला. सामन्यात संघाचा मालक शाहरुख खान आणि के के आरच्या चाहत्यांच्या चेहर्‍यावर  आनंदाचे एक कारण म्हणजे अबराम देखील होता.

webdunia

सामन्याच्या दरम्यान आणि जिंकल्यानंतर शाहरुख अबरामला कडेवर घेऊन फिरत होता. पहिला सामना जिंकल्यानंतर शाहरुख खान म्हणाला, सामना जिंकणे नेहमीच छान वाटते. हा आमचा पहिला सामना होता आणि आम्ही चांगली खेळी खेळून विजय मिळविला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi