Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता अजहरही पाक खेळाडूंच्या पाठीशी!

आता अजहरही पाक खेळाडूंच्या पाठीशी!

वार्ता

कोलकाता , मंगळवार, 2 फेब्रुवारी 2010 (16:51 IST)
शाहरुख, अमीर या खान मंडळींपाठोपाठ आता भारताचा माजी कर्णधार अजहरुद्दीन यानेही पाक खेळाडूंना आयपीएल सामन्यात घेण्याचा सल्ला आयपीएल संघांना दिला असून, आपल्याला या खेळाडूंना बद्दल सहानुभूती वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे.

आयपीएल सारख्या चांगल्या सामन्यात अशा प्रकारचा भेदभाव केल्यास चांगला खेळ पाहण्यास प्रेक्षक मुकतील असे त्याने म्हटले आहे.

पाक खेळाडू आयपीएलमध्ये नसल्याने आपल्याला दु:ख झाल्याचे त्याने म्हटले आहे. पाक खेळाडू दर्जेदार असून, त्यांना आयपीएलपासून दूर ठेवणे चुकीचे असल्याचेही अजहरने म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi