Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयपीएल स्पर्धेस न्यायालयाचा हिरवा झेंडा?

आयपीएल स्पर्धेस न्यायालयाचा हिरवा झेंडा?
मुंबई , शुक्रवार, 8 एप्रिल 2016 (15:02 IST)
एकीकडे मैदानांवर पाणी मारणार आणि दुसरीकडे शेकडो लोकांचा जीव जाऊ देणार का, टँकर लॉबीला पाणी कुठून मिळते याची चौकशी करा, असे सांगत उच्च न्यायालयाने आयपीएल स्पर्धेला अप्रत्यक्ष हिरवा झेंडा दाखविला आहे.

दुष्काळामुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर निर्बंध आणावेत या मागणीच्या जनहित याचिकेवरील सुनावणी न्या. विद्यासागर कानडे व न्या. मकरंद कर्णिक यांच्यासमोर झाली. खंडपीठाने मुंबईतील पहिल्या सामन्याला स्थगिती देण्यास नकार दिला. आम्हाला आयपीएलशी देणेघेणे नाही. दुष्काळाची चिंता वाटते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.  पुढील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब करताना यासंदर्भात सरकारचे उत्तर पाहून पुढील निर्णय घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi