Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयपीएल-6 तीन एप्रिलपासून

आयपीएल-6 तीन एप्रिलपासून

वेबदुनिया

WD
भन्नाट मनोरंजन करणार्‍या इंडियन प्रीमिअर लीग यंदाच्या सत्राच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून, आयपीएलचे हे सहावे सत्र तीन एप्रिलपासून सुरू होणार आहे. गतविजेता कोलकाता नाईटरायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिलसदरम्यान ईडन गार्डनवर होणार्‍या सामन्याने आयपीएलच्या सहाव्या सत्राला सुरुवात होणार आहे.

आयपीएलचे सहावे सत्र जवळपास आठ आठवडे चालणार असून, आयपीएलमध्ये नव्यानेच समावेश करण्यात आलेला सनरायजर्स हैदराबाद हा संघ या सत्रात सहभागी होणार आहे. गत ऑख्टोबर महिन्यात डेक्कन चार्जर्स हैदराबादला आयपीएलमधून निलं‍बित करण्यात आल्यानंतर या संघाचा समावेश करण्यात आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi