Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयपीएल 8मध्ये कोलकाताने विजयासोबत केली सुरुवात

आयपीएल 8मध्ये कोलकाताने विजयासोबत केली सुरुवात
कोलकाता , गुरूवार, 9 एप्रिल 2015 (10:51 IST)
आयपीएलचा पहिल्या सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईला रोहित शर्मा आणि कॉरे अँडरसन यांच्या अर्धशतकी खेळीने 3 बाद 168 धावांची मजल मारता आली होती. कोलकताना 18.3 षटकांत 3 बाज 170 धावा केल्या. सूर्यकुमार यादव त्यांचा हिरो ठरला. त्याने 20 चेंडूंत 1 चौकार, पाच षटकारांसह नाबाद 46 धावांचे योगदान दिले. र्णधार गौतम गंभीरने ४३ चेंडूत ५७ धावांचा तडाखा देताना संघाच्या विजयाचा पाया रचला. या दोघांमुळे पहिल्या डावात रोहित शर्माने केलेली नाबाद ९८ धावांची दणकेबाज खेळी झाकोळली गेली.
 
मुंबई इंडियन्सने कर्णधार शर्माच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर यजमानांना १६९ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला अँडरसनने धक्का देताना सलामीवीर रॉबिन उत्थप्पाला बाद केले. मात्र मनिष पांड्येने गंभीर सोबत
 
किल्ला लढवताना दुसऱ्या विकेट्साठी ८५ धावांची भागीदारी केली. यावेळी दबावाखाली आलेल्या मुंबईला दिलासा देत हरभजन सिंगने पांड्येला बाद केले. पांड्येने २ चौकार व ३ षटकारांसह २४ चेंडूत ४० धावा फटकावल्या. यावेळी मुंबई पुनरागमन करणार असे दिसत असतानाच सुर्यकुमारने तुफान फटकेबाजी करताना सामन्याचा निकाल स्पष्ट केला. त्यापूर्वी, मॉर्ने मॉर्केल याने आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईच्या फलंदाजांना नुसतेच जखडून ठेवले नाही, तर त्यांच्या दोन विकेटही मिळविल्या. दुसऱ्या बाजूने शकिब अल हसन याने देखील आदित्य तरेला स्थिरावू दिले नाही; पण तोवर एकाबाजूने खेळणाऱ्या रोहित शर्माने न्यूझीलंडच्या अष्टपैलू कॉरे अँडरसनला साथीला घेत मुंबईचा डाव सावरला. या जोडीने जम बसताच फटकेबाजी करून मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभी करून दिली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 131 धावांची नाबाद भागीदारी केली. रोहित शर्माला मात्र आठव्या आयपीएलमध्ये शतकी सलामी देता आली नाही. तो 65 चेंडूंत 12 चौकार, 4 षटकारांसह 98 धावांवर नाबाद राहिला. अँडरसन याने देखील अर्धशतकी खेळी करताना 41 चेंडूंत 55 धावा केल्या. त्याने चार चौकार आणि तीन षटकार ठोकले. रोहितचे आयपीएलमधील 23वे अर्धशतक झळकाविले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi