Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑस्ट्रेलियन गोटास बंडखोरीचा सुरंग

ऑस्ट्रेलियन गोटास बंडखोरीचा सुरंग
, सोमवार, 11 मार्च 2013 (18:19 IST)
FILE
संघव्यवस्थापनाच्या दिशानिर्देशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना मोहाली कसोटीतून वगळण्यात आल्यानंतर शेन वाटसन याने तडकाफडकी ऑस्ट्रेलियाकडे कूच केल्याने कांगारूंच्या गोटास बंडखोरीच्या सुरूंगाने भेदल्याचे बोलले जात आहे.

चेन्नई व हैदराबाद कसोटीत भारतासमोर शरणागती पत्करणार्‍या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना संघव्यवस्थापनाने वैयक्तिक व संघाची कामगिरी सुधारण्यासाठी प्रेझेंटेशन देण्याची सूचना सर्व खेळाडूंना केली होती. मात्र शेन वाटसन, जेम्स पॅटीन्सन, मिचेल जॉन्सन व उस्मान ख्वाजा हे संघव्यवस्थानाच्या आज्ञेचे पालन करू शकले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.

मात्र यानंतर इतर खेळाडू सरावात व्यस्त असताना शेन वाटसन याने तडकाफडकी मायदेशाकडे प्रयान केल्याने बंडखोरी च्या वृत्तास बळ मिळाले आहे. (भाषा)

Share this Story:

Follow Webdunia marathi