Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोलकाताचा शानदार विजय

कोलकाताचा शानदार विजय
शारजा , शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (10:45 IST)
अखेरच्या षटकातपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर केवळ दोन धावांनी विजय मिळवला. अंतिम षटकात रॉयल झेलने कोलकाताला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करत कोलकाताने बंगळूरपुढे विजयासाठी १५१ धावांचे आव्हान दिले होते. मात्र बंगळूरुला पाच बाद १४८ धावा करता आल्या.

विजयासाठी १५१ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बंगळूरकडून कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. बंगळूरची शानदार सुरुवात झाली. आठव्या षटकात योगेश टागेवाला ४० धावावर बाद झाला. जॅक कॅलिसने टागेवालाला तंबूत पाठविले. त्यानंतर पार्थिव पटेलही २१ धावा करून तंबूत परतला. कर्णधार विराट कोहलीने ३१ धावा फटकावल्या आणि युवराजसिंगनेही ३१ धावा काढल्या.अखेरच्या षटकात सहा चेंडूत नऊ धावांची गरज होती. मात्र त्यांना सहाच धावा करता आल्या. त्याआधी नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने कोलकता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीकरण्याची संधी दिली. मात्र कोलकाताची सुरुवात खराब झाली. केवळ दहा धावातच त्यांचे दोन गडी बाद झाले. त्यानंतर कॅलिस आणि लिन यांनी तिस-या विकेटसाठी ८० धावा जोडल्या. गंभीर मात्र आजही आजही फ्लॉप ठरला. गंभीरला शून्याचा भोपळाही फोडता आला नाही. त्याच्या पुढील षटकात मनीष पांडे ५ धावांवर तंबूत परला. मात्र त्यानंतर कॅलीस आणि लेयन या जोडीने केकेआरचा डाव सावरला. या भागिदारीमुळे कोलकाताला १५० पर्यंतचा टप्पा गाठता आला. कॅलिसने ४३ धावा केल्या तर लियनने ४५ धावा केल्या. ११ व्या षटकात लेयन ४५ धावांवर बाद झाला. पठाणने त्याला तंबूत पाठविले. तर १६ व्या षटकात कॅलिसही ४३ धावांवर चहलच्या चेंडूवर बाद झाला.१७ व्या षटकात उथप्पा २२ धावांवर बाद झाला. बंगळूरकडून वरूण आरोनने सर्वाधिक तीन गडी बाद केले.

कोलकाता- सात बाद १५०
बंगळूरु- पाच बाद १४८
गौतम गंभीरचे आगळे रेकॉर्ड 

Share this Story:

Follow Webdunia marathi