Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोलकाता कसोटीसाठी संघ जाहीर!

कोलकाता कसोटीसाठी संघ जाहीर!

वेबदुनिया

WD
इंग्लंडविरुद्ध कोलकाता येथे खेळल्या जाणार्‍या तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची येथे घोषणा करण्यात आली. गत दोन कसोटी सामन्यांत खेळलेला संघच निवड समितीने कायम ठेवला, परंतु दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या जागेवर अशोक दिंडा याला संधी देण्यात आली आहे.

इंग्लंडविरुद्ध शेवटच्या दोन्ही कसोटी सामन्यांसह दोनी टी-20 सामन्यांसाठीही मंगळवारीच भारतीय संघाची निवड करणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळने सोमवारी म्हटले होते, परंतु नागपूर येथे होणार्‍या चौथ्‍या कसोटीसह टी-20 सामन्यांसाठी संघाची घोषणा नंतर करणार असल्याचे जहीर करण्यात आले. दुसर्‍या कसोटीत पराभूत होणारा भारतीय संघ काही दिवस विश्रांती घेऊन 2 डिसेंबरला कोलकात्यात दाखल होईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सोमवारी पार पडलेल्या दुसर्‍या कसोटीत भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या फिरकीपटूंकडे, तर फिरकीपटूंनी इंग्लंडच्या फलंदाजांपुढे स्पेशल शरणागती पत्करल्याने संघात मोठे बलद होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, परंतु संघात फार मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. केवळ कोलकाता कसोटीसाठी पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या यादवच्या जागी दिंडाचा समावेश करण्यात आला आहे. उमेश यादवला 10 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi