Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रिकेटच्या व्यस्ततेमुळे धोनी परीक्षेत नापास

क्रिकेटच्या व्यस्ततेमुळे धोनी परीक्षेत नापास

वेबदुनिया

WD
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी क्रिकेटमधील व्यस्ततेमुळे पदवी परीक्षेला बसू न शकल्यामुळे पुन्हा एकदा नापास झाला आहे.

धोनीने येथील सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात 2008मध्ये बी.कॉमच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे, परंतु भारतीय संघाच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामुळे पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यात त्याच्यासमोर अडच णी निर्माण झाल्या. यंदाही क्रिकेटच्या व्यस्ततेमुळेच पहिल्या सत्रात त्याला परीक्षेला बसता आले नाही. आता पहिल्या सत्राचा निकाल जाहीर झाला असून, त्यात धोनीला गैरहजर म्हणून शेरा देण्याता आला आहे.

सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाचे प्राध्यापक निकोल्स टेटे म्हणाले, की पहिल्या सत्रासाठी आम्ही त्याला अभ्यासक्रम पाठविला होता, परंतु त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना सोमवारी पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi