Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गांगुलीचा आयपीएलला अखेरचा जय महाराष्ट्र

गांगुलीचा आयपीएलला अखेरचा जय महाराष्ट्र
कोलकाता , सोमवार, 29 ऑक्टोबर 2012 (18:19 IST)
PTI
बंगाल टायगर अर्थात सौरव गांगुलीने यापुढे आयपीएलमधून न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सद्या तो पुणे वॅरियर्स संघाकडून खेळत होता.

आयपीएलसाठी फॉर्म कायम राहावा म्हणून त्याने प. बंगाल संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणे सुरु ठेवले होते. मात्र मागिल वर्षात आयपीएलमध्ये पुणे संघाकडून खेळताना निराशाजनक कामगिरी झाल्याने त्याने शेवटी निवृत्तीचा निर्णय घेतला.

आयपीएलचा सहावा हंगाम संपेल तेव्हा माझे वय ४१ वर्षाचे असेल. झटपट क्रिकेटमध्ये पूर्णपणे तंदुरुस्ती आवश्यक आहे. या प्रारुपात खेळणे शरीरासाठी आव्हानात्मक असते, असे तो म्हणाला.

आयपीएलमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणे खडतर आहे. तुम्हांस कित्येक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. यापेक्षा राष्ट्रीय संघाचे कर्णधार होणे परवडले, असे तो म्हणाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi