Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चेन्नईचे वादळ फायनलमध्ये धडकले

मुरली विजयच्या झंझावातात दिल्लीची वाताहत

चेन्नईचे वादळ फायनलमध्ये धडकले

वेबदुनिया

चेन्नई , शनिवार, 26 मे 2012 (00:06 IST)
मुरली विजयच्या झंझावातात दिल्लीची वाताहात झाली. चेन्नईने ८६ धावांनी विजय संपादन करून फायनलमध्ये दिमाखात प्रदेश केला. ५८ चेंडूत ११३ धावांची खेळी करणारा चेन्नईचा मुरली विजय सामन्याचा मानकरी ठरला.

WD
WD
आयपीएल-५ स्पधेच्या क्वालिफायर राउंडमध्ये चेन्नई सुपर किंग्ज ने दिल्लीसमोर विजयासाठी २२३ धावांचा डोंगर ठेवला. नाणेफेक जिंकून चेन्नईस फलंदाजीस बोलावण्याचा दिल्लीचा कर्णधार सेहवागचा निर्णय पुरता ‍चूकीचा ठरला. दिल्लीची गोलंदाजी निष्प्रभ राहिली. उमेश यादव शिवाय एकही गोलंदाज मुक्त फटकेबाजी करणार्‍या चेन्नईच्या फलंदाजांना मुसक्या बांधू शकला नाही. मुरली विजय, सुरेश रैना, डॅरेन ब्राव्हो यांनी मुक्त फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभा केला.

लक्षाचा पाठलाग करताना महेला जयवर्धने शिवाय दिल्लीचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकला नाही. ‍दिल्लीने सामन्यात अगोदरच शरणागती पत्करली होती. त्यांच्या खेळाडूंच्या हालचालीतून ते स्पष्ट जाणवत होते.

फायनलमध्ये चेन्नईचा मुकाबला २७ तारखेला कोलकाता नाइट रायडर्स सोबत होईल. चेन्नईने मैदान मारल्यास ते आयपीएल करंडकाची हॅट्ट्रिक साधतील.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi