Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्लीसमोर लॉयन्सचे आव्हान

दिल्लीसमोर लॉयन्सचे आव्हान
डर्बन , गुरूवार, 25 ऑक्टोबर 2012 (13:05 IST)
FILE
चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-२० स्पर्धेत साखळी गटात अपराजीत राहून सेमीफायनलमध्ये धडक मारणार्‍या दिल्ली डेअरडेव्हिल्स समोर लॉयन्सला त्यांच्या गुहेत घुसून पराभव करण्याचे आव्हान आहे.

सेमीफायनलमध्ये पोहचणारा दिल्ली आयपीएलमधील एकमेव संघ असल्याने संपूर्ण भारताच्या आशा दिल्लीवर केंद्रीत झाल्या आहेत.

दिल्लीने साखळी गटात दोन सामन्यात शानदार विजय साजरा केला तर दोन सामने पावसात घुतल्या गेले. यामुळे दिल्लीवर एकही संघ विजय मिळवू शकला नाही. दिल्लीस नॉकआउट राउंड मध्येही ही कामगिरी कायम ठेवावी लागेल.

दुसरीकडे लॉयन्सने तीन सामने जिंकले असून एक पराभव पचवला आहे. सिडनी सिक्सर्सविरूद्ध ते पराभूत झाले होते.

लॉयन्सचे घरचे मैदान असल्याने त्यांना परिस्थिसोबतच मनोवैज्ञानिक फायदाही मिळेल. स्पर्धेत लॉयन्सच्या खेळावर लक्ष टाकल्यास गोलंदाजी व फलंदाजी दोन्ही क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे.

दुसरी सेमीफायनल सामना शुक्रवारी टायटन्स व सिडनी दरम्यान होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi