Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धवन- कोहलीचे भांडण केवल काल्पनिक कथा - धोनी

धवन- कोहलीचे भांडण केवल काल्पनिक कथा - धोनी
ब्रिस्बेन , शुक्रवार, 26 डिसेंबर 2014 (12:09 IST)
ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवशी फलंदाजी क्रमावरून भारतीय ड्रेसिंग रूममध्ये केवळ संभ्रमावस्था झाली होती. त्यावर चर्चेनंतर पटकन तोडगाही काढण्यात आला होता. यावरून सुरू असलेल्या शिखर धवन आणि विरोट कोहली यांच्यातील भांडणाच्या काल्पनिक कथा रंगवल्या जात असल्याचे स्पष्टीकरण धोनीने दिले आहे. शेवटच्या क्षणी कोहलीला फलंदाजी करण्यास पाठविण्यात आल्याने केवळ संभ्रमावस्था निर्माण झाली होती. याहून अधिक काहीच नाही, असे धोनीने स्पष्ट केले. भारतीय ड्रेसिंग रूममधील अशांततेच्या वृत्तावरून पत्रकार परिषदेत कर्णधार धोनीवर प्रश्नांचा भडीमार करर्यात आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi