Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धोनीची कमतरता जाणवली: वाडेकर

धोनीची कमतरता जाणवली: वाडेकर

भाषा

नवी दिल्ली , मंगळवार, 31 मार्च 2009 (13:17 IST)
न्यूझीलंडविरुध्द दुसर्‍या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची कमतरता जाणवली. त्याच्या अनुपस्थितीत वीरेंद्र सेहवाग आपली छाप पाडू शकला नाही, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी व्यक्त केले.

श्री.वाडेकर यांनी सांगितले की, दुसर्‍या कसोटीत धोनीची कमतरता जाणवली. धोनीचे नेतृत्व सामन्यादरम्यान नेहमी जाणवते. धोनीच्या अनुपस्थितीत सेहवागला चांगली संधी मिळाली. परंतु तो आपली छाप पाडू शकला नाही. तो कर्णधार व फलंदाज म्हणून विशेष काही करु शकला नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi