Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धोनीच्या घराजवळ तीन संशयीतांना अटक

धोनीच्या घराजवळ तीन संशयीतांना अटक

भाषा

राची , शुक्रवार, 31 जुलै 2009 (21:51 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. नशेत असणारे हे तिघही धोनीच्या घराजवळ सुरक्षेसाठी असणार्‍या पोलिसांची रायफल खेचत होते. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली आहे.

धोनी 'हमर' गाडी घेवून राचीतील आपल्या निवासस्थानी आला होता. दुपारी तीन संशयीत व्यक्ती त्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतांना पोलिसांना दिसले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सुरक्षा रक्षकांची रायफल हिसकवली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना त्वरीत ताब्यात घेतले. धोनीची नवीन गाडी पाहण्यासाठी आल्याचे या तिघांनी पोलिसांना सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi