Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन घर सचिनसाठी फलदायी!

नवीन घर सचिनसाठी फलदायी!

वेबदुनिया

मुंबई , शुक्रवार, 30 सप्टेंबर 2011 (16:51 IST)
सचिन तेंडुलकरसाठी नवीन घर "फलदायी' ठरेल, असे भाकीत जगप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांनी व्यक्त केले आहे. सचिनने बुधवारी पेरी क्रॉस रोडवरील त्याच्या नवीन बंगल्यात गृहप्रवेश केला.

""सचिनची पृथ्वीतत्त्वाची रास असल्यामुळे त्याने प्रचंड लोकप्रियता कमावली आहे. पृथ्वीप्रमाणेच तो क्रिकेटच्या मैदानावर स्थिर असतो,'' असेही दारूवाला यांनी या वेळी सांगितले.

त्याने घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर नवीन घरात प्रवेश केला आहे. सचिनच्या पत्रिकेत "राजयोग' आणि "कुमारयोग' असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रिकेत राजयोग असणारी व्यक्ती त्याच्या क्षेत्रात मोठे नाव कमावते. असा योग फार कमी व्यक्तींच्या पत्रिकेत असतो. सचिनप्रमाणेच मुकेश अंबानी, नरेंद्र मोदी, बराक ओबामा आणि अटलबिहारी वाजपेयींच्या पत्रिकेत हा योग आहे, असेही दारूवाला म्हणाले.


Share this Story:

Follow Webdunia marathi