Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निवृत्तीचा निर्णय घेण्याचा सचिनलाच अधिकार - कादीर

निवृत्तीचा निर्णय घेण्याचा सचिनलाच अधिकार - कादीर

वेबदुनिया

PR
सचिन तेंडुलकर हा क्रिकेटमधील 'कोहिनूर हिरा' आहे. त्याच्यात विलक्षण प्रतिभा ठासून भरली आहे, अशा शब्दात पाकिस्तानचा महान माजी फिरकी गोलंदाज अब्दुल कादीर याने सचिन तेंडुलकरवर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच निवृत्तीचा निर्णय हा सर्वस्वी सचिनचा स्वत:चा अधिकार आहे. त्याला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही, असेही कादीर याने नमूद केले. सचिनने निवड समितीच्या दयेवर अवलंबून न राहता विक्रमांच्या शिखरावर असताना निवृत्त व्हावे, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज इम्रान खान याने म्हटले होते.

त्यावर बोलताना कादीर म्हणाला की, सचिन एक खास खेळाडू आहे. त्याने क्रिकेटला खूप काही दिले आहे. असा खेळाडू एका युगात एकदाच जन्माला येतो. त्यामुळे आपण कितीकाळ खेळत रहावे आणि सन्यास कधी घ्यावा, हे त्याला स्वत:लाच ठरवू दिले पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi