Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न खेळणार्‍या धोनीचा विचार करा: अझरूद्दीन

न खेळणार्‍या धोनीचा विचार करा: अझरूद्दीन
, सोमवार, 12 ऑक्टोबर 2015 (10:23 IST)
नवी दिल्ली- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच टी-20 सामन्यात फलंदाज अजिंक्य राहणेस न खेळविण्याच्या भारतीय संघव्यवस्थापनाच्या निर्णयावर माजी कर्णधार व शैलीदार फलंदाज मोहम्मद अझरूद्दीन यांनी टीका केली आहे. 
 
रहाणे हा अंबाती रायुडू याच्यापेक्षा कितीतरी चांगला फलंदाज असल्याचे अझरूद्दीन यांनी म्हटले आहे. याचबरोबर, धोनी हा पहिल्यासारखा फलंदाज राहिलेला नसल्याचे स्पष्ट मत अझरूद्दीन यांनी व्यक्त केले. धोनी हा पहिल्यासारखी कामगिरी करत नसेल तर निवड समितीने त्याच्याबद्दल विचार करावा, असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi