Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पॉटिंग: कसोटी क्रिकेटपटू बनला टी-२० कर्णधार

पॉटिंग: कसोटी क्रिकेटपटू बनला टी-२० कर्णधार
, बुधवार, 3 एप्रिल 2013 (18:15 IST)
FILE
रिकी पॉटिंग कसोटी क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असून टी-२० क्रिकेटपटू म्हणून कधीही त्याची ओळख नव्हती. ट्वेंटी-२० मध्ये आपणास सहज वाटत नसल्याचे सांगून त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटकडे पाठ वळवली होती. मात्र मुंबई संघ व्यवस्थापनास पॉंटिंग मध्ये काहीतरी विशेष आढळले आणि त्यांनी त्यास संघाचा कर्णधार नियुक्त केले. या पार्श्वभूमीवर पॉटिंगला संघव्यवस्थापनाच्या विश्वासास खरे उतरावे लागेल.

पॉटिंग याअगोदरही कोलकाता संघाकडून टी-२० लीग मध्ये खेळला आहे. मात्र काही सामने खेळल्यानंतर त्याने वनडे व टेस्ट क्रिकेटवर संपूर्ण लक्ष केंद्रित केले. आता आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपृष्टात आल्यानंतर त्याने परत इकडे मोर्चा वळवला आहे.

त्याने देशाअंतर्गत बिगबॅश टी-२० लीग स्पर्धेत तास्मानियाकडून जबरदस्त प्रदर्शन केले आहे. भारतातही लीग क्रिकेटमध्ये तो कामगिरीची पुनरावृत्ती करू शकेल काय, हा खरा प्रश्न आहे. पॉटिंग आगमनाने मुंबईचा कर्णधारपदाचा प्रश्न नेहमीकरता सुटेल काय, हेही स्पष्ट होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi