Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी शशांक यांची निवड निश्चित

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी शशांक यांची निवड निश्चित
नवी दिल्ली , सोमवार, 28 सप्टेंबर 2015 (17:44 IST)
विदर्भ क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. शशांक मनोहर पुन्हा एकदा मंडळ (बीसीसीआय)च्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  कारण त्यांना अनुराग ठाकूर व शरद पवार या दोन्ही गटांचा पाठिंबा आहे. दालमिया यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर दोन्ही गटाच्या पसंतीचे उमेदवार ठरले आहे.
 
मनोहर यांच्या उमेदवारीला आता पवार व ठाकूर या दोन्ही गटांचे समर्थन लाभले आहे.
 
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,‘केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि अनुराग ठाकूर यांनी मनधरणी केल्यानंतर मनोहर पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार झाले आहेत. पवार यांनी दुजोरा दिला तर मनोहर यांची निवड निश्चित आहे.’
 
ठाकूर आणि पवार गट एकत्र आले तर मनोहर यांना २९ पैकी १५ मते मिळणे निश्चित आहे. अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ही संख्या पुरेशी आहे. या समीकरणामुळे श्रीनिवासन यांच्या आपल्या पसंतीच्या उमेदवाराला अध्यक्षपदी विराजमान करण्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi