Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना

वेबदुनिया

मुंबई , बुधवार, 28 मार्च 2012 (15:00 IST)
कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ एकमेव ट्वेंटी-२० सामन्यासाठी आज (बुधवार) दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३० मार्चला जोहान्सबर्ग येथे ट्वेंटी-२० सामना होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेत भारतीय व्यक्ती स्थायिक होऊन १५० वर्षे पूर्ण झाल्याने या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. आशिया करंडक स्पर्धेत सहभागी झालेला भारतीय संघ या सामन्यासाठी रवाना झाला आहे. या संघात सचिन तेंडुलकरऐवजी रॉबिन उथप्पाचा समावेश आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून राहुल द्रविडच्या सन्मानार्थ गौरव सोहळ्याचे मंगळवारी रात्री आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व खेळाडू सहभागी झाले होते. दक्षिण आफ्रिकेहून परतल्यानंतर सर्व खेळाडू ४ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi